*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
*जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नगरपंचायतींच्या स्वच्छता योद्धांनी साधला संवाद ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’ साठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन केले*
नाशिक(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार ‘स्वच्छता ही सेवा 2026’ ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे, या उपक्रमांतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा व सन्मान शिबिर’ आयोजित करणे, नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये कार्यरत सफाई कर्मचारी अर्थात ‘स्वच्छता योद्ध्यांशी’ त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. यावेळी नगरपंचायतीच्या 12 सफाई कर्मचारी व स्वच्छता योद्ध्यांचा जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष संवाद साधत समस्या समजून घेतल्या. यावेळी नगरविकास शाखेचे सहआयुक्त शाम गोसावी उपस्थित होते. स्वच्छता योद्ध्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. गणवेश वितरणामुळे स्वच्छता योद्ध्यांमध्ये उत्साह व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी सफाई कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ, आयुष्मान भारत कार्ड, किमान वेतन, रेशनकार्ड ऑनलाइन प्रक्रिया, दिवाळी बोनस, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच नियमित आरोग्य तपासणी याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे तसेच उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असेही त्यांनी सांगितले.
‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा’चा संकल्प
परिसंवादाच्या शेवटी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरगाणा शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रभावी नियोजन करून काम करण्याचे मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहीम अधिक व्यापक व प्रभावी करताना सुरगाणा शहराची ओळख ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा पर्यावरणपूरक सुरगाणा’ अशी निर्माण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता योद्ध्यांनी एकजुटीने काम करावे असे निर्देश त्यांनी दिले. या कार्यक्रमास सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भरत वाघमारे, मुख्याधिकारी सुभाष जानोरे, लेखापाल निशांत नागरे यांच्यासह नगरपंचायतीचे स्वच्छता मुकादम विजय गोयल, शहर समन्वयक सम्यक बागुल व प्रधानमंत्री आवास योजना प्रशांत ढिकले, कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते.



