*लांजाआरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचामृतदेह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजाआरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचामृतदेह*
*लांजाआरगाव येथे विहिरीत आढळला तरुणाचामृतदेह*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील आरगाव खालील वाडी येथील मयूर प्रकाश जाधव (वय28) या तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आजारपणाला कंटाळून त्याने विहिरीत उडी मारुन हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार मयूर जाधव यांच्या कमरेखालील शरीराची संवेदनशीलता कमी झाल्याने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच पाली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. दरम्यान शुक्रवारी दुपारी तो घरात कोणालाही न सांगता निघून गेला होता.बराच वेळ तो परत आल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्याचा सर्वत्र शोध सुरु केला शोध मोहीमे दरम्यान वाडीतील मनोहर खामकर यांच्या दगडी विहिरीत मयूरचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला तत्काळ बाहेरून काढून रुग्णवाहिकेतून लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी विजय तुकाराम जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 नुसार आकस्मिक मृत्यूची (रजि.नं 51/2026) नोंद केली आहे घटनेचा जाहीर अहवाल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार (ब.नं 409) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



