*शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
*शेजवलीत ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा*
राजापूर(प्रतिनिधी):-शेजवली गावात आमदार किरण सामंत यांच्या सुचनेनुसार श्रमदानातून 4 ऑक्टोबर 2026 रोजी वनराई बंधारा बांधण्यात आला. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे शेतीचे, बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामूळे शेतकरी पूर्ण अडचणीत आले आहेत. पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याचे स्रोता मध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता आहे. विहिरीमध्ये पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. पुढील काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. या अनुषंगाने शेजवली गावचे सरपंच मंदार राणे यांनी पुढाकार घेऊन गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, विभाग संघटक महेश कारेकर, उपसरपंच दिलीप मेस्त्री, शाखाप्रमुख गोपीनाथ कदम, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या श्रमदान बंधारा बांधण्यात आला.



