*गणेशभक्त आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांच्या परिणाम,गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सादर केल्याचे प्रकरण तळोदा येथे शाळेचे शिक्षक आणि à
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणेशभक्त आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांच्या परिणाम,गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सादर केल्याचे प्रकरण तळोदा येथे शाळेचे शिक्षक आणि à
*गणेशभक्त आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांच्या परिणाम,गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सादर केल्याचे प्रकरण तळोदा येथे शाळेचे शिक्षक आणि संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तळोदा शहरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नेमसुशील विद्या मंदिर शाळेने सादर केलेल्या वादग्रस्त देखाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खोटा इतिहास सादर करून हिंदु - मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी स्थानिक 'नेमसुशिल विद्यामंदिर' चे शिक्षक अन् संचालक यांच्याविरुद्ध अखेर तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गणेशभक्त आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 18 सप्टेंबर या दिवशी तळोदा शहरात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ' नेमसुशील विद्यामंदिर' संस्थेने या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे चित्रण करताना छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची प्रतिमा साकारून एका थडग्याच्या प्रतिकृतीसमोर त्यांना कव्वाली ऐकताना दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. शाळकरी मुलांना मुसलमान धर्मियांच्या वेष परिधान करायला लाऊन खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. देखाव्याची व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. इतिहासाचे चुकीचे किंवा काल्पनिक चित्रण करून धार्मिक व सामाजिक भावना दुखावण्याचा तसेच समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप गणेशभक्त, शिवभक्त आणि हिंदु जनजागृती समिती यांनी तळोदा तहसीलदार व पोलिस प्रशासनाकडे निवेदन देत माफीनाम्या ऐवजी सखोल चौकशी करून कायद्यानुसार कारवाईची मागणी केली होती. अनेक दिवस गुन्हा दाखल न झाल्याने हिंदु जनजागृती समितीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिस प्रशासनाने प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांच्या नोंदीनुसार, तळोदा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0483/ 2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(1)(a), 196(1)(b), 197 (1)(c), 299, 302 तसेच 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक निलेश चंद्रकांत साळी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भावी पिढीच्या मनावर विकृत इतिहास बिंबवून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध केवळ गुन्हा न नोंदवता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला हवी अशी पोलिसांकडे मागणी आहे.



