*बालरंगभूमी परिषद आयोजित'जल्लोष लोककलेचा' स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेलीच्या समूह नृत्यास सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बालरंगभूमी परिषद आयोजित'जल्लोष लोककलेचा' स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेलीच्या समूह नृत्यास सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त
*बालरंगभूमी परिषद आयोजित'जल्लोष लोककलेचा' स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेलीच्या समूह नृत्यास सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि संस्कृती नव्या पिढीमध्ये रुजवून बाल कलाकारांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषद आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे 2 व 3 ऑक्टोबर रोजी लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. या महा अंतिम फेरीत राज्यभरातील एकूण 21 जिल्ह्यातील बालकलावंतांनी समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल वादन व एकल नृत्य या विविध गटात सहभाग नोंदवला होता. पैकी समूहनृत्य या गटात नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, होळतर्फे हवेली, नंदुरबार या शाळेने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावले आहे. सदर पारितोषिक हे लावणी सम्राज्ञी व महाराष्ट्र लोककला महासंघाच्या अध्यक्षा सुरेखा पुणेकर, सुप्रसिध्द गायक मंगेश बोरगावकर यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर, त्र्यंबक वडस्कर, शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, निमंत्रित सदस्य संजय रहाटे, देविप्रसाद सोहनी, बाळकृष्ण ओडेकर, प्रमुख सल्लागार गोविंद गोडबोले, अरुण पटवर्धन, संजय पाटील देवलाणकर व बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजीत आचार्य यांच्यासह सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. बालरंगभूमी परिषद आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, सुप्रसिद्ध गायक अभिजीत कोसंबी व बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले होते. या सर्वोत्कृष्ट लोकनृत्याच्या समूहात प्रज्ञा प्रवीण बच्छाव, भूमिका गोपाल गवळे, जीविका संतोष पवार, प्रियंका आबा पवार, नीलम दिलीप वसावे, रविना प्रकाश कोकणी, मनीषा काशिनाथ पाडवी, स्वाती दीपक आखाडे, मृणाली एकनाथ कोळी, सोनल गंगाराम शिंदे या विद्यार्थिनींचा समावेश होता. तर या नृत्याचे नृत्यदिग्दर्शन शाळेच्या अधिक्षिका श्रीमती सुषमा मोरे यांनी केले होते. या विद्यार्थिनींना मिळालेल्या या यशाबद्दल नंदुरबार जिल्ह्याचे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा चौधरी, शिक्षिका अनिता बागुल, अभिमान गावित, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष नागसेन पेंढारकर, कार्याध्यक्ष मनोज सोनार, प्रमुख कार्यवाह राजेश जाधव यांच्यासह जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ कलावंतांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.



