*स्वातंत्र्याच्या 80 वर्षात पक्का रस्ता नाही,श्रमदानातून मोठा तोलवापाडा ग्रामस्थांनी बनवला रस्ता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षात पक्का रस्ता नाही,श्रमदानातून मोठा तोलवापाडा ग्रामस्थांनी बनवला रस्ता*
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षात पक्का रस्ता नाही,श्रमदानातून मोठा तोलवापाडा ग्रामस्थांनी बनवला रस्ता*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोठा तोलवापाडा गावाला स्वातंत्र्याची 80 वर्षे झाले तरी आजही पक्का रस्ता नाही. ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने चक्क ग्रामस्थांनीच श्रमदानातून रस्ता बनवायला सुरुवात केली आहे. 80 वर्षांत एकदाही हा रस्ता मंजूर झाला नाही का ? रस्ता मंजूर झाला तर रस्ता कुठे गेला ? पैसा कुठे गेला ? नुसता बोर्ड लावून उद्घाटन करून रस्ता कोणी गायब केला ? कोणता आमदार, अधिकारी, ठेकेदार यांनी हा रस्ता रस्ता गायब केला ? या भागात के.सी.पाडवी हे 35 वर्षे आमदार होते आता आमशा पाडवी विद्यमान आमदार आहेत, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, गेल्या दोन वर्षांपासून बिरसा फायटर्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी नंदुरबार, तहसीलदार अक्कलकुवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आयुक्त नाशिक आणि महाराष्ट्र शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र आजपर्यंत ठोस कार्यवाही झालेली नाही. आमचा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सरळ सवाल आहे 80 वर्षांच्या काळात या गावासाठी 4 किलोमीटरचा रस्ता मंजूर करणेही शक्य झाले नाही का?रस्ता नसल्यामुळे आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा वर्षांत रस्त्याअभावी सर्पदंश आणि वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. फक्त रस्त्याचे बोर्ड लावून विकास होत नाही, प्रत्यक्ष जमिनीवर रस्ता दिसला पाहिजे!आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की प्रशासनाची वाट पाहून थकलेल्या ग्रामस्थांना स्वतःच्या हाताने रस्ता तयार करण्याची वेळ आली आहे. ही केवळ एका गावाची समस्या नाही; हा प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे. माजी आमदार के. सी. पाडवी असोत किंवा विद्यमान आमदार आमश्या पाडवी असोत या गावाच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी का सुटला नाही, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. श्रेय घेण्यासाठी राजकीय नेते पुढे येतात; मग या मूलभूत प्रश्नासाठी प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली की जबाबदारी कोण घेणार?भाजप असो, काँग्रेस असो किंवा शिवसेना राजकारण कोणाचेही असो, रस्ता मात्र जनतेचा आहे!पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा हा सुमारे 4 किलोमीटरचा रस्ता तातडीने मंजूर करून खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे. फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू झाले पाहिजे. ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारा हा रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, प्रशासनाने जर अजूनही दुर्लक्ष केले, तर बिरसा फायटर्स ग्रामस्थांसोबत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आणखी तीव्र आंदोलन उभारेल.



