*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अतिदुर्गम आश्रमशाळा व जि.प. शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त ठेवून त्या शिक्षकांना जिल्हा परिषद कार्यालयात मुख्यालयात अडकवून ठेवले आहे. परिणामी डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थी शिक्षकाविना शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षक आठवड्यातुन फक्त दोन दिवस शाळेवर जातात हा शिक्षण हक्काचा (RTE) भंग आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्रातील आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक यांना बेकायदेशीरपणे मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर आणले आहे. अतिदुर्गम भागातील PHC बंद अवस्थेत आहेत,गरोदर माता, बालकांना 20-25 किमी पायी जावे लागत आहे. हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे.शासन GR नुसार प्रतिनियुक्तीला बंदी असताना, केवळ CEO, Dy CEO (सा.प्र.), जिल्हा आरोग्य अधिकारी व कार्यालय अधीक्षक यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. तात्काळ सर्व बेकायदेशीर प्रतिनियुक्ती रद्द करून शिक्षकांना शाळेवर व आरोग्य कर्मचाऱ्यांना PHC वर पाठवावे. जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.
जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत 5 ऑक्टोबर 2026 पासून जिल्हा परिषद समोर जन आक्रोश आंदोलन अन्नत्याग उपोषण सुरू राहील.



