*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा 3 ऑक्टोबर 2026 रोजी यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.गणेश सोनवणे, जिल्हा सचिव प्रा.भरत चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अंकुश रघुवंशी व जिल्हा उपाध्यक्ष प्रा.असिफ शाह, प्रा सुदेश सूर्यवंशी, प्रा विजय परमारकर उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक जिल्हा सचिव प्रा. भरत चव्हाण यांनी केले. त्यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांचा, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांचा तसेच आगामी काळातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेत सभेची भूमिका स्पष्ट केली. जिल्हा सचिव प्रा.भरत चव्हाण यांनी जिल्हा संघटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मागील एक वर्षात संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कार्यांचा सविस्तर अहवाल पुस्तिका स्वरूपात तयार केली. या अहवाल पुस्तिकेत संघटनेने वर्षभरात शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा, आंदोलने, निवेदने, बैठका, विविध उपक्रम तसेच संघटनात्मक कार्याचा आढावा समाविष्ट करण्यात आला आहे. ही अहवाल पुस्तिका जिल्हा सचिव प्रा. भरत चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच संघटनेच्या पारदर्शक व संघटनात्मक कार्याची माहिती सर्व सदस्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सदर अहवाल पुस्तिका व्हॉट्सॲप ग्रुपवरही शेअर करण्यात आली.
सभेत अन्यायकारक संच मान्यता हा महत्त्वाचा विषय चर्चेत घेण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांवर होणारा संभाव्य परिणाम, संच मान्यतेतील निकष आणि त्यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून करता येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.शिक्षकांच्या सेवा सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील काळात कोणत्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल, याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. यावेळी फरक बिलासंदर्भात शिक्षकांना आवश्यक माहिती देण्यात आली. फरक बिलाची प्रक्रिया, संबंधित बाबी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांनी व शिक्षकांनी घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील आवश्यक बाबी आणि प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यू-डायस प्रणालीतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यू-डायस प्रणालीमध्ये ‘आधार व्हॅलिड’ विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य न धरता, आधार क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन संचमान्यता निश्चित करण्याबाबत संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली. सभेत संघटनेच्या जिल्हा व राज्य पातळीवरील कार्याचा आढावा, आजपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी, तसेच शैक्षणिक वर्ष 2026-27 ची तालुकानिहाय वर्गणी जमा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेच्या आगामी कार्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.अंकुश रघुवंशी यांनी विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रा.गणेश सोनवणे यांनी संघटनेची एकजूट, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आगामी काळातील संघटनात्मक भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडून चर्चेत सहभाग घेतला.
प्रा.प्रदीप साळुंखे, प्रा.अनिल जगदाळे, प्रा.सुदेश सूर्यवंशी, प्रा.सी. के. ठाकरे, प्रा.बी. सी. पवार, प्रा.संजय मराठे, प्रा.आर. एल. पाटील, श्रीमती प्रा.बी. यू. गोसावी, प्रा.एन. एस. पाटील, प्रा.ए. एम. वळवी, प्रा.विजय परमारकर आदी जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.



