*कोळवणखडीचे प्रगतशील शेतकरी नागेश बने यांच्या भात शेतीवर यंदा पडला करपा रोग गेल्या वर्षी भातपीक स्पर्धेत पटकावला होता प्रथम क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोळवणखडीचे प्रगतशील शेतकरी नागेश बने यांच्या भात शेतीवर यंदा पडला करपा रोग गेल्या वर्षी भातपीक स्पर्धेत पटकावला होता प्रथम क्रमांक*
*कोळवणखडीचे प्रगतशील शेतकरी नागेश बने यांच्या भात शेतीवर यंदा पडला करपा रोग गेल्या वर्षी भातपीक स्पर्धेत पटकावला होता प्रथम क्रमांक*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील कोळवण खडी येथील प्रगतशील शेतकरी नागेश बने यांच्या भात शेतीवर करपा रोग पडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील वर्षी जिल्हामध्ये भातशेती पिक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे नागेश बने यंदा मात्र भात शेतीला मुकनार आहेत. त्यांच्या सर्व शेतीवर करपा रोग पडून पूर्णता भात शेतीची वाट लागली आहे. त्यातच पाऊसाने दडी मारल्यामुळे अती उन्हाची झळ सर्व शेतकरी वर्गाला बाधित होत आहे. त्या मधेच बने सारख्या अनेक शेतकरी वर्गाची शेती संपुष्टात आली आहे. तर दुसऱ्या बाजूने पावसाने तोंड काढल्याने शेतकरी वर्ग पुरताच हवालदिल झाला आहे. शेतीच्या तोंडावर पिके येवून तिथेच ती खुंटली जात आहेत. असा दुतर्फी फटका शेतकरी वर्ग झेलत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्ग करणार तरी काय असा पेच पडून राहीला आहे.
शासनाने या सर्व गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करून आधीच दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु वर्षभराची शेती जर का वाया गेली तर शासन देवून देवून असे काय देणार आणि शेतकरी वर्गांचे सांत्वन कसे काय करणार तेंव्हा संबधीत खात्याने पूर्ण विचार करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पहाणी करावी आणि योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाने केली आहे.