ताजा खबरे:
*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
*​मालेगाव तहसीलदारांचा चौकशी अहवाल फेटाळला,अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल व विभागीय चौकशीचे आदेश, गहाळ फाईल प्रकरणात मालेगाव तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर विविध कायद्यांनुसार कारवाईचे संक
*3 ऑक्टोंबर मराठी भाषा अभिजात दिन*
*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*​श्री संत सेना एज्युकेशन फाउंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*​श्री संत सेना एज्युकेशन फाउंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*

  • Share:

*​श्री संत सेना एज्युकेशन फाउंडेशनचा विद्यार्थी गुणगौरव व सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री संत सेना एज्युकेशन फाउंडेशन, शहादा व नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व सेवापूर्ती सन्मान समारंभ इंदिरा मंगल कार्यालय, नंदुरबार येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे होते. हिरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. ​यावेळी निम्स हॉस्पिटलचे सर्जन डॉ. शिरीष शिंदे, डागा हॉस्पिटलचे डॉ. भिकमचंद जैन, राज क्लिनिकचे डॉ. संदीप जैन, हिरा प्रतिष्ठानचे सचिव रुपेश चौधरी, आर. सी. पटेल प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक जगदीश सोलंकी, स्पेक्ट्रम टेलीकॉमचे डायरेक्टर गणेश जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते विजय होळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येऊन कार्यक्रमाच्या शुभारंभ  डॉ. रवींद्र चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
श्री संत सेना एज्युकेशन  फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष सोनवणे यांनी,  प्रास्ताविकातून संस्थेच्या विद्यार्थीहिताच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्पर्धेच्या युगात वाचनालयाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी
यावेळी एम एच.टी. सी.ई. टी., जे.ई. ई.  अभियांत्रिकी व आणि नीट  या वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये समाजात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. तसेच ​पदविका, पदवी आणि उच्च पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सेवापूर्ती निमित्त अशोक सोनवणे, शरद सोनवणे, राजेंद्र पवार आणि गोटू पवार यांचा सहपत्निक शाल, साडी आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, ​आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जगदीश सोलंकी, प्रा.डॉ. अनिल साळुंके आणि सुचिता पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नगर विकास आयोग अंतर्गत नगर रचना अधिकारी ​पदी निवड झाल्याबद्दल धीरज परमारकर तसेच प्रशिक्षणासाठी परदेशात जाऊन मायदेशी परतलेले किरण साळुंके आणि ओम जांभळे यांचाही सन्मान करण्यात आला.याप्रसंगी उद्घाटक डॉ. रवींद्र चौधरी यांनी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठावे तसेच आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवावी. शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाची आणि जीवनाची खरी उंची वाढते, असे त्यांनी सांगितले.
​यावेळी त्यांनी समाजातील पाच गरीब, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याची तसेच संस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी बहुमोल योगदान देण्याची उद् घोषणा केली. अध्यक्षीय भाषणातून उद्धव जांभळे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ​कार्यक्रमास समाजाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, विभागीय अध्यक्ष, विविध संस्था व पतसंस्थांचे पदाधिकारी, मंडळांचे अध्यक्ष, समाजबांधव भगिनी, पालक, तरुण मित्रमंडळे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास    बाजीपुरा येथील डॉ.परेश मर्चंट, पुणे येथील उद्योजक गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी भरीव मदत केली. ​कार्यक्रमात जगदीश सोलंकी, प्रा.डॉ.अनिल साळुंके, अशोक सोनवणे, प्रकाश जाधव, धीरज परमारकर आदींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  फाउंडेशनचे सचिव अशोक जाधव आणि संचालिका उज्वला जांभळे यांनी केले.
​कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष अजितेम सोनवणे, सहसचिव रमण सोनवणे, कोषाध्यक्ष हरीश सोळंकी, मार्गदर्शक नागिन सोनवणे, संचालक डॉ.उद्धव जाधव, संचालक पुरुषोत्तम कन्हैया, राजेंद्र सूर्यवंशी, जयेश सोनवणे, प्रशांत होळकर, राकेश परमारकर, संचालिका आरती नांदेडकर तसेच संत सेना प्रेरित व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ​तसेच पूंजरू जाधव, अजय जाधव, डॉ. जितेंद्र जाधव, योगेश होळकर, भानुदास वाघ, विजय सोनवणे आणि भूषण पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आदिवासी समाजावर अन्याय,नंदुरबार जिल्हा परिषदेतील बोगस प्रतिनियुक्तीचा फटका थेट गरीब आदिवासींना बसतोय*
October, 04 2026
*नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संपन्न*
October, 04 2026
*​मालेगाव तहसीलदारांचा चौकशी अहवाल फेटाळला,अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल व विभागीय चौकशीचे आदेश, गहाळ फाईल प्रकरणात मालेगाव तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर विविध कायद्यांनुसार कारवाईचे संक
October, 04 2026
*3 ऑक्टोंबर मराठी भाषा अभिजात दिन*
October, 04 2026
*नंदुरबारमध्ये ‘महाकुंभ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’संपन्न 175 तरुणांची अंतिम निवड 2 हजार 475 उमेदवारांचा सहभाग*
October, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज