ताजा खबरे:
*पोक्सो गुन्हयातील आरोपीला अति जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा*
*DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर "BEST BEAUTICIAN AWARD" ने सन्मानित*
*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पोक्सो गुन्हयातील आरोपीला अति जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पोक्सो गुन्हयातील आरोपीला अति जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा*

  • Share:

*पोक्सो गुन्हयातील आरोपीला अति जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापुर पोलीस ठाणे हद्दीतील तिनटेवा गोसावीवाडा, ता. नवापुर जि. नंदुरबार येथील वास्तव्यास असलेले फिर्यादी नामे xxxxxx यांची 15 वर्ष 8 महिने असलेली बालिका नामे xxxxx हि नवापुर शहरातील वनिता विदयालय येथे इयत्ता 10 वी चे वर्गात शिक्षण घेत असतांना दि. 13 नोव्हेंबर 2025 रोजी लहान बहीणीसह स्कुटीने शाळेत गेली होती. दरम्यान सदर बालिकेने स्कुटीची चावी तिच्या मैत्रिणीकडे देत वही घेण्याचे कारण देत शाळेतून निघून गेली होती. सायंकाळी उशिरापावेतो मूलगी घरी न आल्याने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी आजुबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने फिर्यादी यांच्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाणे येथे गुरनं 609/2025, भा.न्या.सं.क. 137 (2) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने नवापुर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अभिषेक पाटील यांनी सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे यांचेकडे सोपविला होता. तपास अधिकारी व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदारांनी गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करत 18 नोव्हेंबर 2025 रोजी पिडीत बालिकेस शोधून काढले होते. सदर बालिकेस धिर देत तिला विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने आरोपी अजय ऊर्फ निखील ताराचंद राठोड याने तिचे अपहरण केल्याचे व तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध केल्याचे सांगितले होते. यावरुन गुन्हयात भा.न्या. सं.क.64(1),65 (1) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 12 अन्वये वाढीव कलम लावण्यात आल्याने आरोपीविरुध्द महत्वाचे पुरावे जमा करण्यात आल्यानंतर मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांचे न्यायालयात सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार ए. एच. सय्यद यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका xxxx वय 15 वर्षे 8 महिने, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपी अजय ऊर्फ निखील ताराचंद राठोड विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार ए. एच. सय्यद यांनी आरोपीस भा.न्या. सं.क.65 (1) अन्वये दोषी ठरवत वीस वर्ष (20 वर्ष) सश्रम कारावास व 5000 रुपये दंड तसेच भा.न्या.सं.क. 137 (2) अन्वये पाच वर्ष (5 वर्ष) सश्रम कारावास व 2500 रूपये दंड तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 अन्वये वीस वर्ष (20 वर्ष) सश्रम कारावास व 5000 रुपये दंड आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 अन्वये एक वर्ष (1 वर्ष) सश्रम कारावास व 1000 रुपये दंड असा एकूण 13500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. विजय सी. चव्हाण यांनी कामकाज पाहिले होते. तसेच मुख्य पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती योगिता राठोड, कोर्ट पैरवी अंमलदार पोहेकों/नितीन साबळे, पोहेकॉ राजेंद्र गावीत, पोहेकॉ शैलेंद्र जाधव, पोकों देवेंद्र पाडवी व मपोशि/545 दुर्गा वळवी यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार हनमंत गायकवाड व जिल्हा सरकारी वकील अॅड. व्ही. आर. गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पोक्सो गुन्हयातील आरोपीला अति जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावला 20 वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा*
October, 02 2026
*DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर "BEST BEAUTICIAN AWARD" ने सन्मानित*
October, 02 2026
*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
October, 02 2026
*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
October, 02 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
October, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज