ताजा खबरे:
*DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर "BEST BEAUTICIAN AWARD" ने सन्मानित*
*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
*एकलव्य विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*

  • Share:

*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. 4 (केंद्र रायपाटण) बुधवार 30 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.30 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षण परिषदेत केंद्रातील शिक्षकांनी विविध शैक्षणिक विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शनाचा लाभ घेतला. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून निपुण अभियान, शाळानिहाय आढावा, विविध शैक्षणिक पोर्टल तसेच शिक्षण प्रवाहातील बदल याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी नवनवीन उपक्रमांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘निपुण अभियान शाळानिहाय आढावा’ तसेच ‘विविध पोर्टल व शिक्षणप्रवाहातील बदल’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रासाठी केंद्रसमन्वयक किशोर शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात वर्ग प्रक्रियेतील सकारात्मक व सुधारात्मक बाबी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शन या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळ सुधाकर जाधव (रायपाटण नं. 3), सौ. दिपाली धावडे (रायपाटण नं. 1) आणि सौ. शारदा रेडेकर (रायपाटण नं.5) यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. किशोर चव्हाण (धामणपे) यांनी सर्व वर्गशिक्षक व विषयशिक्षकांना मासिक नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
चौथ्या सत्रात शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व पाठपुरावा या विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी सौ. मानसी सुर्वे (परुळे नं.3) यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी पालक व शिक्षकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली. पाचव्या सत्रात My Gooru App तसेच Room to Read उपक्रम याबाबत माहिती देण्यात आली. या सत्रात श्री. शरद वाशिंबे परुळे नं. 3) आणि सुनील भांडेकर यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल साधनांचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला अधिक परिणामकारक बनविण्याबाबत माहिती देण्यात आली.
या शिक्षण परिषदेत प्रशासकीय मार्गदर्शन, मासिक कामकाजाचे संकलन, अहवाल लेखन आदी बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक दिशा मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहवाल लेखन सौ. अश्विनी माने, मासिक काम संकलन परमेश्वर धुळे, आभार रंगराव चौगुले यांनी जबाबदारी पार पाडली. या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना आपल्या अध्यापन पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी वापर करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. शिक्षकांनी परिषदेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर "BEST BEAUTICIAN AWARD" ने सन्मानित*
October, 02 2026
*हरळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र.4 उत्साहात संपन्न*
October, 02 2026
*राजापूर तहसील कार्यालयात 5 ऑक्टोबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’, नागरिक व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
October, 02 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
October, 02 2026
*एकलव्य विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
October, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज