*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) च्या माध्यमातून बालकांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. लहान मुलांमधील हृदयविकार व इतर आरोग्य समस्यांचे वेळेत निदान व्हावे, यासाठी 5 ऑक्टोबर 2026 रोजी मोफत 2D इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा रुग्णालय, DEIC विभाग, पहिला मजला, महिला रुग्णालय, नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये बालकांची 2D इको तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, जन्मजात हृदयविकार, हृदयातील छिद्र तसेच इतर हृदयविषयक समस्या वेळेत ओळखण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत बालकांमधील जन्मजात दोष, आजार व वाढीतील अडथळे यांचे लवकर निदान करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.“सुदृढ बालक, सुदृढ भारत” या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या पाल्यांची मोफत 2D इको तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.शिबिराबाबत अधिक माहितीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा.



