ताजा खबरे:
*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद*
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

  • Share:

*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यात 'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रधान सचिव निपुण विनायक व आयुक्त आरोग्य सेवा संजय काटकर तसेच शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे यांचे निर्देशानुसार आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. नमन गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियान यशस्वितेसाठी ग्राम स्तरावरील सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, विभागनिहाय, संस्थानिहाय ठरवण्यात आलेले निर्देशांक नुसार गुणांकन मध्ये आढळून आलेले त्रुटी वर विशेष भर देऊन त्याबाबत सूक्ष्मनियोजन करून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व विभागांनी एकत्रित येवून समन्वयाने कामकाज करणे बाबत सूचित केले.
या कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांनी अभियानात आपण दैनंदिन करत असलेले कामकाज अधिक प्रभावी पणे व सांख्यीकी दृष्ट्या अहवालासह नोंदी ठेवाव्यात व नियमित अहवाल सादर करणे काही व्यत्यय असल्यास संबंधित विभागाशी समन्वयाने कामकाज करून अभियान निरंतर यशस्वितेसाठी कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन केले. राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अक्षय राउतवाड व गोविंद मोरे यांनी अभियान बाबत विस्तृत माहिती दिली व उपस्थितांच्या शंकेचे निरासन केले. ग्राम स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी मार्गदर्शन केले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांनी शासन निर्णय नुसार मुद्देनिहाय विश्लेषण करून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा उद्देश व सहभाग
माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे "प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त" या तत्त्वज्ञानावर आधारित महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्यमान सुधारण्यासाठी । एप्रिल 2026 पासून हे महत्वकांक्षी अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्याला एक निरोगी, सक्षम, जागरूक आणि सशक्त जिल्हा घडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. गावोगावी आरोग्य सेवा अधिक बळकट करणे आणि अभियानाची उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील प्रातिनिधिक सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य सेवक / सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हास्तरीय कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या शेवटी अभियानाची गावोगावी प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. 

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"माझं गाव आरोग्य संपन्न गाव" अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 30 2026
*नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद*
September, 30 2026
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
September, 30 2026
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
September, 30 2026
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
September, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज