*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील
वडदहसोळ गावचे सुप्रसिद्ध समाजसेवक असलम मुकादम यांचे सुपुत्र अफ्फान मुकादम याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. अफ्फान आणि त्याच्या टीमने 'आशिया रोबोटिक्स स्पर्धेत' (Asia Robotics Competition) भारताचे प्रतिनिधित्व करत सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशियातील अनेक देशांमधील दिग्गज टीम्स सहभागी झाल्या होत्या. अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक स्पर्धेत अफ्फान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अफाट कौशल्यामुळे आणि कल्पकतेमुळे पंचांनी त्यांना प्रथम क्रमांकाचा बहुमान देऊन सुवर्णपदकाने सन्मानित केले.
वडदहसोळसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या अफ्फानच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण राजापूर तालुक्यातून व विशेषतः वडदहसोळ गावातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका समाज सेवकाच्या मुलाने आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि अखंड मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण कोकणासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.
अफ्फानच्या या यशाबद्दल त्याचे, त्याच्या टीमचे आणि मुकादम परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून त्याच्या पुढील शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटचालीसाठी ग्रामस्थ व मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.



