*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मार्लेश्वर पंचक्रोशीतील बामणोली गावातील उगवतीवाडीच्या कन्या आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कुमारी सन्मिता संजना संजय जाधव यांनी BAMS (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery) ही वैद्यकीय पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली आहे. कु सन्मिता संजना संजय जाधव या राजाराम रामचंद्र जाधव यांच्या नात असून, आपल्या मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील आपल्या मुळांशी असलेले नाते जपत मुंबईत वास्तव्यास असताना वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून सन्मिता यांनी बामणोली गावासह संपूर्ण मार्लेश्वर पंचक्रोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सन्मिता यांच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे काका शांताराम सखाराम माईन यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि पाठबळ अत्यंत मोलाचे ठरले.
सन्मिता यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या वाटचालीचे आणि त्यांना या क्षेत्रात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे श्रेय त्यांच्या काकांना जाते.
त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच मार्लेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सन्मिता यांच्या या यशामुळे बामणोली गावातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नव्या पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
कुमारी सन्मिता संजना संजय जाधव यांना BAMS पदवी प्राप्त केल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांच्या हातून समाजाची आणि गरजू रुग्णांची मनोभावे सेवा घडो, बामणोली गावासाठी आणि मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी ही निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे!



