*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासकीय आश्रमशाळा, बोरद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी, उपचार व विविध आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारांनी ग्रस्त विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार जागेवरच औषधोपचार करण्यात आले. तसेच ताप असलेल्या संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
किशोरवयीन मुला-मुलींसाठी विशेष समुपदेशन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुड टच आणि बॅड टच या विषयावर विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजारांचा प्रसार रोखण्यासाठी योग्य पद्धतीने हात धुण्याचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.
यावेळी कुष्ठरोग निर्मूलन, सिकल सेल, हिपॅटायटीस व HIV/AIDS यांसारख्या विविध आजारांबाबत माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू व मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी शाळा परिसरात सर्व्हे करून डासांच्या उत्पत्तीची संभाव्य ठिकाणे तपासण्यात आली. या आरोग्य शिबिरास वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका तसेच आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सक्रिय उपस्थिती लाभली. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य, स्वच्छता, आजार प्रतिबंध आणि सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.



