*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
*सेवा संकल्प अभियान,घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘सेवा संकल्प अभियान’ व ‘राष्ट्रपिता राष्ट्रनेता अभियान’ अंतर्गत ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ मौजे घोटाणे येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून भटक्या-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजना, दाखले व प्रमाणपत्रांचा लाभ गावपातळीवर एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला.
या शिबिरात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा 1 लाभार्थी तसेच 2 उत्पन्न दाखले, 13 शिधापत्रिका, 7 जात प्रमाणपत्रे, 4 जन्म-मृत्यू दाखले, 4 विवाह प्रमाणपत्रे आणि इतर 7 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अशा विविध स्वरूपाच्या सेवांद्वारे एकूण 60 नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कार्यालयीन पातळीवर वारंवार येण्याची गरज भासू नये, तसेच पात्र लाभार्थ्यांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. गाव पातळीवरच विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे भटक्या-विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले असून, नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



