*नंदुरबार कारागृह अधिविक्षक मंडळ समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती,नवनियुक्त सदस्यांचे डॉ. अभिजीत मोरे यांच्याकडून अभिनंदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार कारागृह अधिविक्षक मंडळ समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती,नवनियुक्त सदस्यांचे डॉ. अभिजीत मोरे यांच्याकडून अभिनंदन*
*नंदुरबार कारागृह अधिविक्षक मंडळ समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती,नवनियुक्त सदस्यांचे डॉ. अभिजीत मोरे यांच्याकडून अभिनंदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा कारागृह वर्ग-1 अंतर्गत कारागृह अधिविक्षक मंडळ समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीवर विविध क्षेत्रातील मान्यवरांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निर्देशानुसार सदर समितीचे गठन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा कारागृह अधीक्षक कार्यालयाच्या आदेशानुसार दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी गठित करण्यात आलेल्या या समितीमध्ये अँड. राऊ दिलीपराव मोरे, मोहन पवनसिंग शेवाळे, धनंजय भरत गावीत, श्रीमती सुनिता प्रमोद शिंपी, संतोष रतनसिंग पराडके, यशवंत रायसिंग ठाकरे आणि अलीम मोहम्मद मक्राणी यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे यांनी सर्व नवनियुक्त अशासकीय सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सदस्यांच्या अनुभवाचा उपयोग समितीच्या कामकाजात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारागृह अधीक्षक मंडळ समितीच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा कारागृहाची नियमित तपासणी व देखरेख, बंदींच्या हक्कांचे संरक्षण, कारागृहातील स्वच्छता, अन्न व वैद्यकीय सुविधांचा दर्जा तसेच बंदींच्या विविध समस्यांचा आढावा घेण्याचे काम केले जाणार आहे. समितीच्या बैठका दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद आहे.



