*शासकीय आश्रमशाळा वाघाळे येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासकीय आश्रमशाळा वाघाळे येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
*शासकीय आश्रमशाळा वाघाळे येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत शासकीय आश्रमशाळा वाघाळे, ता. जि. नंदुरबार येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार सावळे, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. व्ही. सोनार, डी. एच. माळी, बी. ए. आव्हाड, वाघाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुषमा पवार, उपसरपंच गणेश चौरे, पंचायत समिती सदस्य संतोष साबळे, माजी पंचायत समिती सदस्य देवमन चौरे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वाघाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मंगल कनेलाल पवार यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. याक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्ती जोपासावी आणि या स्पर्धांच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू निर्माण व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना देण्यात आली. योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहितीपत्रकांचे वितरणही करण्यात आले. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील विविध शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वाघाळे येथील मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी परिश्रम घेतले. अशी माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) नंदकुमार साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



