ताजा खबरे:
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली खुर्द व चौपाळे येथे,भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान संपन्न*
*जिल्ह्यात आज‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’,जिल्ह्यातील 9 ठिकाणी रोजगार मेळावे, युवक- युवतींना उपलब्ध होणार रोजगाराची संधी*
*जिल्ह्यात विशेष सखोल प्रक्रियेला वेग, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन BLO कागदपत्रे स्वीकारणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा*
शहादा(प्रतिनिधी):-वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे एम पाटील, प्रमुख व्याख्याता प्रा. गणेश अनिल पडघन, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य जे बी पवार उपस्थित होते.
प्रा. पडघन यांनी स्वयंसेवकांना  आपल्या मनोगतात  विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली.
स्वावलंबन, चारित्र्यवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे 24 सप्टेंबर 1969 साली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रारंभ करण्यासंबंधीची संकल्पना ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांची आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील तरुणांनी विशेषतः महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे. भारत हा 'खेड्यांचा देश असल्या कारणाने खेड्यांतील जनतेला स्वातंत्र्याची सर्व फळे उपभोगता आली पाहिजेत. यासाठी त्यांना कार्यप्रवण केले पाहिजे. म्हणून 1950 मध्ये विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी युगातील आदर्श शिक्षण क्षेत्रात राबवण्यासाठी विचारविनिमय करण्याच्या हेतूने जानेवारी 1950 मध्ये एक बैठक आयोजित केली. त्या आधारे 1952 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत समाजसेवा आणि शारीरिक श्रम यावर अधिक भर देणारी विद्यार्थ्यांची शिबিরে आयोजित करण्याची योजना आखली.1958 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय पातळीवर विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करताना नऊ महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत समाजसेवेचे ग्रामीण भागात कार्य करावे अशा प्रकारची एक योजना आखावी असे सुचविलेले होते. 1959 च्या शिक्षण मंत्र्यांच्या दिल्ली येथील बैठकीत अशा प्रकारची योजना तयार करावी म्हणून एका समितीची स्थापना डॉ. सी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आली. या समितीने अतिशय महत्त्वाच्या शिफारशी केल्या. 1960 मध्ये प्रा. के. जी. सय्यदीन यांनी वेगवेगळ्या देशांचा अभ्यास करून 'नॅशनल सर्व्हिस फॉर द युथ' हा अहवाल दिला. 1964 मध्ये भारत सरकारच्या शिक्षण सुधारणा आयोगाचे अध्यक्ष डॉ. दौलतसिंह कोठारी यांनी आपल्या अहवामध्ये विद्यार्थ्यांनी समाजसेवा करण्यासंबंधी कोणत्या प्रकारच्या योजना राबवाव्यात यासंबंधी शिफारस केली. मे 1969 मध्ये कुलगुरूंच्या उपसमितीची बैठक होऊन राष्ट्रीय सेवा योजनेचा मसुदा तयार करण्यात आला आणि 24 सप्टेंबर 1969 रोजी त्यावेळचे शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केल्याची घोषणा केली. महात्मा गांधींच्या विचारांना राबविण्यासाठी, पंडित जवाहरलाल नेहरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राज्यातील राज्य सरकारने सुरू केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, शिस्त, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित करणारी महत्त्वपूर्ण चळवळ असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 'मी नाही, तुम्ही’ या रा.से. यो.च्या ब्रीदवाक्याची भावना अंगीकारून स्वयंसेवकांनी सामाजिक उत्तरदायित्व जपावे आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. पवार एस बी यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. भावसार एच डी यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी कार्यक्रम सहाय्यक अधिकारी प्रा. निझरे एन डी प्रा. पवार एच एस प्रा.पाटील आर पी प्रा.सौ.चव्हाण एन टी प्रा.सौ वरुडे एन आर यांनी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
September, 28 2026
*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
September, 28 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत कोठली खुर्द व चौपाळे येथे,भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान संपन्न*
September, 28 2026
*जिल्ह्यात आज‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’,जिल्ह्यातील 9 ठिकाणी रोजगार मेळावे, युवक- युवतींना उपलब्ध होणार रोजगाराची संधी*
September, 28 2026
*जिल्ह्यात विशेष सखोल प्रक्रियेला वेग, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन BLO कागदपत्रे स्वीकारणार*
September, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज