*नगराध्यक्ष रत्ना रघुवंशींच्या आदेश,पालिकेची तत्परता, विसर्जन मिरवणूक संपताच रस्त्यांची स्वच्छता,मध्यरात्रीच पाण्याने धुतले रस्ते*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नगराध्यक्ष रत्ना रघुवंशींच्या आदेश,पालिकेची तत्परता, विसर्जन मिरवणूक संपताच रस्त्यांची स्वच्छता,मध्यरात्रीच पाण्याने धुतले रस्ते*
*नगराध्यक्ष रत्ना रघुवंशींच्या आदेश,पालिकेची तत्परता, विसर्जन मिरवणूक संपताच रस्त्यांची स्वच्छता,मध्यरात्रीच पाण्याने धुतले रस्ते*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अनंत चतुर्दशीला गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या आदेशान्वये शहरात ठिकठिकाणी साचलेल्या रस्त्यांवरील गुलालाचे थर पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहनांमध्ये भरून विल्हेवाट लावली. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या पाण्याच्या बंबाद्वारे रस्त्यांवर पाण्याच्या मारा करून रस्ते स्वच्छ करण्यात आले. विशेष म्हणजे मिरवणूक संपताच मध्यरात्री अनेक भागातील रस्त्यांची सफाई करण्यात आली.
नंदुरबार शहरात 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला शेवटच्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. विसर्जन मिरवणुकांमध्ये गणेश मंडळाकडून मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करीत बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी शहरातील रस्त्यांवर गुलालाचे थर साचलेले होते. साचलेल्या गुलालामुळे नागरिकांना अपाय होऊ नये व आरोग्याचे प्रश्न उद्भवू नये यासाठी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेशित करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, कर्मचाऱ्यांनी विसर्जन मिरवणुका संपल्यानंतर लागलीच माळीवाडा, मुस्लिम वस्ती परिसर, टिळक रोड, गणपती मंदिर, जळका बाजार, मंगळ बाजार, सुभाष चौक, अमृत चौक, शिवाजी रोड, देसाईपुरा, सोनी विहीर परिसर यासह अन्य परिसरात रस्त्यांवर पडलेला गुलाल ट्रॅक्टरमध्ये टाकून रस्ते स्वच्छ करण्यात येऊन अग्निशमन दलाच्या पाण्याच्या बंबाद्वारे रस्ते धुण्यात आले.
गणेशोत्सव म्हटल्यावर गुलालाची उधळण तर होतच असते. मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण केल्यामुळे शहरातील रस्त्यांवर थर साचले होते. रस्त्यांवर पडलेल्या गुलालामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्यानंतर पालिकेच्या स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ रस्त्यांची स्वच्छता, साफसफाई करण्याचे आदेश दिले होते. मध्यरात्रीच अनेक रस्त्यांवर पाण्याच्या मारा करून ते स्वच्छ करण्यात आले तर काही रस्ते मिरवणूक संपल्यानंतर सकाळी स्वच्छ करण्यात आले.
शहरात मिरवणुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गुलाल जमा करणे करिता विसर्जनानंतर दिवशी 4 ट्रॅक्टरवर 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने सहाय्याने मिरवणुकीमार्गावर गुलाल जमा करून साधारण 18 ते 22 टन गुलाल जमा करून तो घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे डम्पिंग करण्यात आला. 2 अग्निशमन दलाच्या पाण्याच्या बंबाद्वारे गुलालाने माखलेल्या त्याच्या सफाईसाठी साधारण 125 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.



