*भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवार 28 सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे मोर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवार 28 सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे मोर्चा*
*भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवार 28 सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे मोर्चा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय किसान संघ नंदुरबार जिल्हातर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नंदुरबार मध्ये 28 सप्टेंबरला मोर्चा भारतीय किसान संघाच्या वतीने आयोजन, जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळावा, तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची भरीव मदत मिळावी, या मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवार 28 सप्टेंबर 2026 रोजी नंदुरबार येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा दुपारी 12.30 वाजता नवापूर चौफुली येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जाणार आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांकडे निवेदन सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार निवेदन मोर्चा दरम्यान सादर करण्यात येणारे सदर निवेदन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे, दुष्काळ जाहीर झाला तरी शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध अडचणी, रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा या मोर्चाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, या मोर्चामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी बंधू- भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय किसान संघाचे भारतीय किसान संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंत्री व सहमंत्री यांनी केले आहे. मोर्चाचा मार्ग नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार



