*भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकला साधणार संवाद,नागरिक,विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा उमेदवार,पालक,संबंधित सर्व घटकांनी उपस्थित राहावे-जिल्हाधिकारी आयुष प्à¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकला साधणार संवाद,नागरिक,विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा उमेदवार,पालक,संबंधित सर्व घटकांनी उपस्थित राहावे-जिल्हाधिकारी आयुष प्à¤
*भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकला साधणार संवाद,नागरिक,विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा उमेदवार,पालक,संबंधित सर्व घटकांनी उपस्थित राहावे-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन*
नाशिक(प्रतिनिधी):-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी राज्यातील सर्व सहा विभागांमध्ये विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित घटकांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील संवाद कार्यक्रम बुधवार 30 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
या संवादामध्ये नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध हितधारक सहभागी होणार आहेत. भरती परीक्षा देताना येणाऱ्या अडचणी, परीक्षा प्रक्रियेतील अनुभव, सूचना, अपेक्षा तसेच परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित घटकांकडून थेट अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहे. भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता अधिक बळकट करणे, पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविणे तसेच उमेदवारांना अधिक सुलभ व न्याय्य परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे परीक्षा प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येणार आहेत. याशिवाय भरती परीक्षा सुधारणांबाबत आपल्या सूचना व अभिप्राय nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत, असेही आवाहन करण्यात येत आहे. टास्क फोर्सच्या विभागनिहाय संवादातून राज्यातील भरती परीक्षा व्यवस्थेबाबत विविध घटकांचे अनुभव, अडचणी आणि अपेक्षा समोर येणार असून, या सूचनांच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत अधिक सुरक्षितता, पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. नाशिक विभागातील नागरिक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार तसेच संबंधित सर्व घटकांनी या संवाद कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना, अनुभव व अभिप्राय मांडावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.



