*सेवानिवृत्त कर्मचारी यांची जबरीने चोरी करुन नेलेली 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 03 तोळयाची चैन 24 तासाच्या आत जप्त करुन गुन्हा उघड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवानिवृत्त कर्मचारी यांची जबरीने चोरी करुन नेलेली 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 03 तोळयाची चैन 24 तासाच्या आत जप्त करुन गुन्हा उघड*
*सेवानिवृत्त कर्मचारी यांची जबरीने चोरी करुन नेलेली 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 03 तोळयाची चैन 24 तासाच्या आत जप्त करुन गुन्हा उघड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-फिर्यादी वसंत सजन ठाकरे, वय 80 वर्ष, धंदा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, रा. कमलकुंज नगर प्लॉट नं. 25 नळवा रोड नंदुरबार ता.जि. नंदुरबार हे दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 04.30 वाजेचे सुमारास नंदुरबार शहरातील हरिओम कॉलनी येथील साईबाबा मंदिराला लागुन असलेल्या मोकळया मैदान परिसरात त्याच्या मगायीचा शोध घेत असतांना त्यांचे मागुन येवुन एका अज्ञात इसमाने गळ्यातील सुमारे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 03 तोळ्याची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावुन तोडुन घेऊन गेला होता. त्यांनी दिलेल्या फिर्याद वरुन उपनगर पोलीस ठाणे नंदुरबार येथे अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. 362/2026 भारतीय न्याय संहिता कलम 304 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्वीनी सानप यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले. दिलेल्या आदेशाप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी आरोपी शोधकामी उपनगर पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकचे अंमलदार यांना आदेशीत करुन सदर अज्ञात आरोपीचा व गेल्या मालाचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना देवून हद्दीत रवाना केले. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा नंदुरबार शहरातील एकता नगर भागात राहणारा इसम आदेश शशिकांत मिश्रा याने केल्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी इसमाचा एकता नगर भागात जावुन शोध घेवुन तो मिळुन आला. त्याला विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली देवुन, गुन्हयात फिर्यादी यांचे गळयातुन जबरीने चोरी करुन नेलेली सोन्याची चैन काढुन दिली आहे. सदरची कामगिरी हि नंदुरबार जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्वीनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर गुन्हे शोध पथकाचे अंमलदार असई/विजय सोनवणे, पोना/1288 संदिप जावरे, पोकों/1364 विनायक गावीत पोकॉ/52 भगवान मुंढे, पोकॉ/555 संकेत चौधरी व पोशि/1031 विपुल पाटील यांनी केली आहे.



