*सुझलॉन पवन उर्जा टॉवरवर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, 3 आरोपीतांकडून 3 लाख रुपये किमतीची 300 किलो तांब्याची तार व वाहनासह एकूण 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत जप्त,स्थानिक गुन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुझलॉन पवन उर्जा टॉवरवर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, 3 आरोपीतांकडून 3 लाख रुपये किमतीची 300 किलो तांब्याची तार व वाहनासह एकूण 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत जप्त,स्थानिक गुन
*सुझलॉन पवन उर्जा टॉवरवर दरोडा टाकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, 3 आरोपीतांकडून 3 लाख रुपये किमतीची 300 किलो तांब्याची तार व वाहनासह एकूण 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-07 सप्टेंबर 2026 रोजी 00.30 वा.च्या सुमारास नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इंद्रीहट्टी शिवारातील सुझलॉन टॉवर क्र.K- 355 येथे फिर्यादी व साक्षीदार असे हजर असतांना, अचानक अनोळखी अंदाजे 10 ते 15 इसम हे त्यांच्या तोंडाला काळे कपडे बांधलेले व अंगात काळे कपडे घातलेले तसेच हातात लाकडी काठ्या, लोखंडी पाईप तसेच कोयते असे हत्यारांसह येथून फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने व काठीने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत त्यांचे मोबाईल जबरीने त्यांचेकडून काढून घेवून धमकावून जबरीने दोन तास बांधून ठेवले तसेच इंद्रशेहड्डी शिवारातील सुझलॉन टावर क्र. K-355 चा दरवाजा कोणत्यातरी मशिनने कापून टॉवर मधील वरील वर्णनाचा कॉपर केबल व इतर साहित्य जबरीने चोरी करुन घेवून गेले म्हणून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 457/ 2026 गा.न्या.सं. कलम 310(2), 311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा अत्यंत गंभीर असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सदर गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करुन गुन्ह्याचा पुढील तपास करुन आरोपीताना जेरबंद करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एक पथक स्थापन करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुझलॉन पवन उर्जा टॉवरमधील तार चोरोच्या गुन्ह्यांचा तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील इंद्रीहट्टी शिवारातोल सुझलॉन टॉवर क्र. K- 355 वर झालेला दरोडा हा धुळे जिल्ह्यातील जामदा, हट्टी येथील राहणारे अनमोल अशोक भोसले, मच्छिंद्र पुंडलिक मासुळे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने केलेलो आहे, असे समजल्याने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदरची माहिती पथकाला कळवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीमधील आरोपीतांचा शोध घेवून अनमोल अशोक भोसले वय- 26 वर्षे रा. जामदा ता. साक्री जि. धुळे, मच्छिद्र पुंडलिक मासुळे वय-29 वर्षे, रा. हट्टी ता.साक्री जि. धुळे, शकील लतीफ खाटीक वय-39 वर्षे, बंदा ड्रायव्हर रा. गरीब नवाज कॉलनी दोंडाईचा ता. दोंडाईचा जि. धुळे यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरचा दरोडा ही त्यांचा आणखी इतर साथीदाराच्या मदतीने केली असलेबाबत सविस्तर माहिती दिली, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून 3 लाख रुपये किमतीची 300 किलो सुजलीन टावरमध्ये वापरण्यात येणारी काळ्या रंगाची तांब्याची तार 4 लाख रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण एकूण 7,00,00 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीतांना देखील लवकरात लवकर ताब्यात घेवून त्यांच्याकडून देखील मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल असे यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सांगितले. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटोल, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटोल, मुकेश तावडे, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, दिनेश वसूले, योगेंद्र सोनार, पोलीस अंमलदार सचिन सैंदाणे, अभय राजपुत, विनोद पाटील, अनिल नागरगोजे यांच्या पथकाने केली आहे.



