*राष्ट्राचे हित हीच खरी सेवा-डॉ. योगेश पाटील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहाने साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्राचे हित हीच खरी सेवा-डॉ. योगेश पाटील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहाने साजरी*
*राष्ट्राचे हित हीच खरी सेवा-डॉ. योगेश पाटील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहाने साजरी*
शहादा(प्रतिनिधी):-राष्ट्राचे हित हीच खरी सेवा-डॉ. योगेश पाटील ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहाने साजरी करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. योगेश आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय.सी.गावीत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व आणि कार्यप्रणाली यांच्यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी दोन वर्षाच्या कालखंडात नियमित कार्यक्रम आणि एक विशेष शिबिर याच्यात उत्स्फूर्तपणे भाग घेणे किती महत्त्वाचे आहे. हे पटवून दिले.या अनुभवातून विद्यार्थी कसा घडला जातो यावर विविध उदाहरणे दिली व विद्यार्थी राष्ट्राची सेवा आणि राष्ट्रप्रेम कसे होते याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.योगेश पाटील यांनी राष्ट्रहित आणि सामाजिक बांधिलकी याच्यावर प्रकाश टाकला. आजच्या तरुण पिढीच्या समोर दिसणारे अनेक आदर्श यातून स्वतःचा मार्ग कसा निवडावा त्यामुळे वर्तमान काळात तरुण पिढी कशी भरकट चालली आहे. याविषयी त्यांनी ऐतिहासिक उदाहरणे दिली आणि राष्ट्रहित आणि राष्ट्रप्रेम याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन दिले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्य कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एस. निकुंभे यांनी केले आणि आभार प्रकटन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.के. पी. पाटील यांनी मानले आणि याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. वाघ आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर बंधू उपस्थित होते.



