*झाडाच्या फांदीत प्राणप्रतिष्ठा करून दिला पर्यावरणाचा संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*झाडाच्या फांदीत प्राणप्रतिष्ठा करून दिला पर्यावरणाचा संदेश*
*झाडाच्या फांदीत प्राणप्रतिष्ठा करून दिला पर्यावरणाचा संदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरात राहणाऱ्या एका कलाशिक्षकाने निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी चक्क वृक्षात गणपती साकारत त्याची प्रतीस्थापना केली. नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे रनाळे येथील धनराज आनंदा पाटील हे सध्या देवमोगरा माध्यमिक विद्यालय बोकळझर ता. नवापूर येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असून शहरातील सीताई नगर येथे वास्तव्यास आहेत. ते चित्रकारासोबत शिल्पकार, निसर्गप्रेमी, समाजप्रेमी आहेत.
निसर्गावर भरभरून प्रेम करणाऱ्या या अवलियाने आता पर्यंत वृक्ष संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले आहेत गावात लेकीचे झाड, पुण्यस्मरणार्थ झाड, वाढदिवसानिमित्त भाऊचे झाड, राहत असलेल्या कॉलनीत झाड, यांच्या शेतात 350 झाडे असे आतापर्यंत 800 च्या वर झाडे लावले आहेत.
काही वर्षांपूर्वी शेतातील एका तुटलेल्या फांदीस घरी आणून तीन वर्षापासून त्या फांदी गणरायाचे रूप देतात या आगळ्यावेगळ्या गणरायाची 2021 साली लोकसत्ताने आयोजित केलेल्या इको फ्रेंडली गणपती स्पर्धेत नागपूर विभागात प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन कौतुक केले.
अनेक मान्यवर दरवर्षी या बाप्पांच्या आरतीसाठी जातात. यावर्षी धनराज पाटील यांनी घराशेजारी स्वतःसाठी सेंद्रिय भाजीपाला युनिटही सुरू केले यातून 15 ते 16 प्रकारच्या भाज्या ते पिकवत आहेत.तोही संदेश त्यांनी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांना आतापर्यंत अनेक कला पुरस्कार मिळालेत.
मागील वर्षी त्यांच्या कॅन्सर असलेल्या वडिलांच्या समोर केलेल्या शेती विषयावरील कृतज्ञता कलाकृतीची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड व लंडन बुक ऑफ नॅशनल रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.
या इको फ्रेंडली पर्यावरण पूरक गणपतीसाठी त्यांनी एकही रुपया खर्च केला नाही कोणतेही हानिकारक वस्तू वापरलेली नाही पुढील वर्षी पाटील यांचा वेगळ्या रूपात बाप्पा निर्मिती किंवा देखावा करण्याचा मानस आहे.



