*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात संकल्प अभियानांतर्गत विकसित भारत 2047 या विषयावर चित्रकला स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात संकल्प अभियानांतर्गत विकसित भारत 2047 या विषयावर चित्रकला स्पर्धा*
*सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात संकल्प अभियानांतर्गत विकसित भारत 2047 या विषयावर चित्रकला स्पर्धा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तालुक्यातील वाण्याविहीर येथील श्री सातपुडा वैभव विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात संकल्प अभियानांतर्गत विकसित भारत 2047 या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
2047 मध्ये भारत देश कुठे असेल. कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केलेली असेल, शेती, विज्ञान तंत्रज्ञान, या विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र काढली.
विद्यार्थ्यांनी भारताच्या विकासाची संकल्पना आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि प्रगती या सह विविध चित्रांच्या माध्यमातून मांडले.विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन सांस्कृतिक समितीचे सुशील मगरे, जयेश सूर्यवंशी, व्ही आर शिंदे, डी व्ही पवार, वर्षा बोरसे यांनी केले. परीक्षणाचे काम निलेश बोराणे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य हंसाबेन पाडवी, संस्थेचे सचिव प्रभाकर उगले, उपमुख्याध्यापक नगिन कोते, पर्यवेक्षक धनराज मराठे, जेष्ठ शिक्षक भगवान मगरे,अनिल जावरे, योगेश्वर बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रथम क्रमांक सुप्रिया आनंद वळवी इयत्ता नववी, द्वितीय अनिल तडवी इयत्ता बारावी, तृतीय क्रमांक प्रमोद संतोष वसावे इयत्ता आठवी तर यश्रश्री रविंद्र तडवी इयत्ता सातवी या विद्यार्थ्यांनी पटकावला.