*सेवा संकल्प अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान-2026 अंतर्गत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समुदाय संसाधन व्यक्ती संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, नंदुरबार येथे आयोजित या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक, उमेद नमन गोयल यांनी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषविले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक परमेश्वर राऊत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी समुदाय संसाधन व्यक्ती या केवळ कर्मचारी नसून ग्रामीण परिवर्तनाच्या शिल्पकार असून महिलांचे सक्षमीकरण झाल्यास गावाच्या विकासाला गती मिळते. प्रत्येक गावात 100 टक्के ‘लखपती दीदी’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. स्वयंसहाय्यता बचत गटांचे कटऑफ, मासिक बैठका आणि डिजिटल आजीविका रजिस्टरची पूर्तता शंभर टक्के करण्यावर त्यांनी भर दिला पाहिजे. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांना केवळ कर्जपुरते मर्यादित न ठेवता उद्योजक बनवावे. शेवगा पावडर, झेरॉक्स सेंटर, मशरूम उत्पादन, दूध संकलन यांसारख्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात यावे. सेवा संकल्प अभियान हे केवळ 30 दिवसांचे अभियान नसून समाजसेवेची संधी आहे. प्रत्येक समुदाय संसाधन दीदीने आपल्या गावातील प्रत्येक घरापर्यंत या अभियानाचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत यांनी नंदुरबार जिल्ह्याने NPA वसुली आणि बँक कर्ज जोडणीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यामागे समुदाय संसाधन व्यक्तींचे अथक परिश्रम असल्याचे सांगितले. गावातील एकही पात्र महिला बचत गटापासून वंचित राहणार नाही, यासाठी 99 ते 100 टक्के सॅच्युरेशन साध्य करण्याची जबाबदारी CRP यांनी पार पाडावी. समुदाय गुंतवणूक निधी आणि बँक कर्जाचा वापर उत्पादक कामांसाठी व्हावा, तसेच प्रभाग संघाचे व्यवस्थापन, लेखे व अंतर्गत लेखापरीक्षण वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक समुदाय संसाधन व्यक्तीने किमान पाच महिलांना वैयक्तिक उद्योगासाठी बँक कर्ज प्रस्ताव सादर करण्यास मदत करावी, जेणेकरून लखपती दीदींची संख्या वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यशाळेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 18 समुदाय संसाधन व्यक्ती तसेच 6 यशस्वी महिला उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, नंदुरबार व नवापूर तालुक्यातील CRP यांनी बँक लिंकेज, NPA वसुली, सॅच्युरेशन आणि लखपती दीदी उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमधील 1 हजारांहून अधिक समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर यांनी केले. शिस्तबद्ध वातावरणात समुदाय संसाधन व्यक्ती संवाद कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.



