*अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीमती हि. गो.श्रॉफ हायस्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीमती हि. गो.श्रॉफ हायस्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
*अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीमती हि. गो.श्रॉफ हायस्कूलला जिल्ह्यात प्रथम क्रमांक*
नंदुरबार(प्रतिनिधी):- श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथील विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2026-27 मध्ये ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047: संधी आणि आव्हाने’ या विषयावर प्रभावी पीपीटी सादरीकरण करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्ह्यातील एकुण 17 शाळांमधील विद्यार्थ्यांनी या विज्ञान मेळाव्यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047: संधी आणि आव्हाने’ या विषयावर पीपीटीच्या आणि चार्टच्या माध्यमातून आपले सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारीभावेश सोनवणे, तसेच विस्तार अधिकारी रविंद्र निकुम यांच्या उपस्थितीत झाले.
विज्ञान मेळाव्याचे परीक्षण डॉ. सुहास भावसार, डॉ. गौरव गुप्ता आणि डॉ. अनिल कुलकर्णी यांनी केले, श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार येथील विद्यार्थिनी कु. तनुष्का प्रकाश आव्हाड हिने ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 संधी आणि आव्हाने’ या विषयावर अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण पीपीटी सादरीकरण केले. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि तिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असुन तिची विभागस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे. या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती प्रतिभा साळुंके मॅडम व सौ. हर्षिता सनेर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बागुल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षक सौ. सीमा पाटील व सुनील शाह यांनी अभिनंदन करून कौतुक केले.



