*चाळीस हजाराची लाच घेतांना पोलिस पाटीलसह त्याचा साथीदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चाळीस हजाराची लाच घेतांना पोलिस पाटीलसह त्याचा साथीदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला*
*चाळीस हजाराची लाच घेतांना पोलिस पाटीलसह त्याचा साथीदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होवू न देता सदर प्रकरण आपसात मिटविण्यासाठी 70 हजार रुपये घेण्याचे निश्चित झाले व त्यानुसार प्रथम 30 हजाराची लाच घेतली व उर्वरित 40 हजार रुपयांची लाच घेताना बिलमांजरेच्या पोलिस पाटीलसह एका खासगी इसमाला नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे, तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होवू न देता सदर प्रकरण आपसात मिटवून देण्यासाठी नवापूर तालुक्यातील बिलमांजरे येथील पोलिस पाटील गिरीश नान्या मावची याने 70 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी 30 हजार रुपये अगोदरच 29 ऑगस्टला तक्रारदाराकडून घेतले होते. यासंदर्भात नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केली. मागील तीन महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचे एका महिलेशी संपर्क झाल्याने त्यातून सदर महिलेचा पतीला माहिती झाल्याने वाद झाला होता. त्या महिलेच्या पतीने बिलमांजरेचे पोलिस पाटील गिरीश नान्या मावची यांना संबंधीत मुलाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायचे असल्याचे सांगितले. म्हणून बिलमांजरेचे पोलिस पाटील गिरीश नान्या मावची व खासगी इसम कांतीलाल रुबजी गावित या दोघांनी तक्रारदार यांना मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल होवू न देता प्रकरण मिटवून देण्यासासठी 70 हजार रुपये मागीतले होते. लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला असता 40 हजार रुपयांची लाच घेतांना बिलमांजरेचे पोलिस पाटील गिरीश नान्या मावची व कांतीलाल रुबजी गावित (रा. आमपाडा) या दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिमय कलम 7, 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. या दोघा संशयीतांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक भारत तांगडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रदीप मैराळे, अप्पर पोलिस अधिक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक प्रशांत भरते, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, असई. विलास पाटील, पोहवा. विजय ठाकरे, संदीप खंडारे, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, पोना. हेमंतकुमार महाले यांच्या पथकाने केली.



