*शाश्वत स्वच्छतेसाठी स्वयंशिस्तीची आवश्यकता-अप्पर मुख्य सचिव पराग जैन, जैन यांचकडून स्वच्छ भारत व जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शाश्वत स्वच्छतेसाठी स्वयंशिस्तीची आवश्यकता-अप्पर मुख्य सचिव पराग जैन, जैन यांचकडून स्वच्छ भारत व जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी*
*शाश्वत स्वच्छतेसाठी स्वयंशिस्तीची आवश्यकता-अप्पर मुख्य सचिव पराग जैन, जैन यांचकडून स्वच्छ भारत व जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छतेसारख्या मूलभूत सवयींमध्ये शाश्वतता आणणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी स्वयंमशिस्त अंगीकारावी. सेवा संकल्प अभियान, स्वच्छता अभियान हे केवळ मर्यादित कालावधीपुरते न राहता या अभियानातून ग्रामस्थांमध्ये वर्तणूक बदल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव पराग जैन यांनी केले. सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचे रामपूर तालुका शहादा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अप्पर मुख्य सचिव पराग जैन बोलत होते. उपस्थिताना मार्गदर्शन करताना जैन म्हणाले की, आरोग्य आणि स्वच्छता यांचा परस्पर संबंध आहे. विद्यार्थी हे विकसित भारताचे स्तंभ आहेत. विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यामध्ये स्वच्छतासारख्या सवयी रुजविणे आवश्यक आहे. आपल्या देशात विविध क्षेत्रातील मनुष्यबळ बुद्धिमान व प्राविण्य याच्यात निपुण आहेत. सर्वांनी आपापल्या क्षेत्रात काम करत असताना शिस्त पाळल्यास भारताने पाहिलेले विकसित राष्ट्राचे स्वप्न निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी गावातील सरपंच, पदाधिकारी यांनी आपले शंभर टक्के योगदान द्यावे असे आवाहनही अप्पर मुख्य सचिव पराग जैन यांनी यावेळी केले. नंदुरबार जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव जैन हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रामपूर, दरा ता. शहादा, घाटली, काकरदा ता. अक्राणी या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, स्वच्छ भारत मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक गणेश मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील शहादा गटविकास अधिकारी महेश पोतदार, सहाय्यक गट विकास विकास राठोड, अक्राणीच्या गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी संगीता नाईक आदींसह पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता महेंद्र नाईक, राहुल गिरासे, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी आदि उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थ व विध्यार्थ्यांना अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमातर्गत 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहीती देऊन अभियान काळात गावागावात स्वच्छता ठेऊन त्याची शाश्वतता ठेवावी. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावामध्ये झालेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपागांचा नियमित वापर करून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याचे आवाहन केले. रामपूर येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छ पाठशाला विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी व ग्रामस्थांना अप्पर मुख्य सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांच्या उपस्थितीत कंपोस्ट खड्डा कसा भरावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यानंतर एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत रामपूर, दरा ता. शहादा व घाटली ता. अकराणी येथे वृक्षारोपण करण्यात आले.तसेच रामपूर येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी बांधण्यात येत असलेल्या कचरा विलगीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. दरा येथे जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे कामाची, पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या शालेय शौचालयाची पाहणी केली. घाटली येथे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या दुहेरी नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या कामाबाबत पाहणी करून गावात स्वच्छतेबाबत सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास रामपूर चे सरपंच सौ भारतीय रितेशकुमार वाघ, उपसरपंच नर्मदा पावरा, ग्रामपंचायत अधिकारी सौ मनीषा माळी, विरपूरच्या सरपंच सौ वसंतीबाई राहासे, उपसरपंच धर्मसिंग पवार, ग्रामपंचायत अधिकारी सुधीर वाघ, घाटलीचे सरपंच दीत्या वळवी ग्रामपंचायत अधिकारी भरत निकुंभे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



