*ओझोन सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली दिशा, पोस्टर व निबंध लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझोन सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली दिशा, पोस्टर व निबंध लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*ओझोन सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली दिशा,पोस्टर व निबंध लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात ओझोन सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पोस्टर स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी ओझोन थराचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण, वाढते प्रदूषण, ओझोन क्षयाची कारणे तसेच पर्यावरण संवर्धनाचे संदेश आपल्या पोस्टर व निबंधातून प्रभावीपणे मांडले. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रकाश चौधरी व प्रा. चंद्रकांत देसले यांनी, तर निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षण प्रा. कन्हैया बोरसे यांनी केले. ओझोन सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेचे युवा नेतृत्व जयदीप नटावदकर, प्राचार्य धर्मेंद्र मराठे, उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी.एन. पाडवी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद उपस्थित होते. परीक्षक प्रा. प्रकाश चौधरी यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. प्रा. योगेश ठाकरे यांनी प्रास्ताविकात ओझोन दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख वक्ते प्रा. चंद्रकांत देसले यांनी ओझोन थराचे पर्यावरणातील महत्त्व, त्याच्या ऱ्हासाची कारणे आणि ओझोनचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार मिळतो आणि त्यांच्यातील ऊर्जा विधायक व सर्जनशील कार्यासाठी उपयोगी पडते.
कार्यक्रमाचे आभार प्रा. कन्हैया बोरसे यांनी मानले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी नंदिनी सोनार व निधी जोशी यांनी केले. सांस्कृतिक मंडळाच्या प्रमुख सौ.मीनल वसावे व सदस्य तसेच विज्ञान मंडळ, भूगोल मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ओझोन सप्ताहातील हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.



