ताजा खबरे:
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*
*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*

  • Share:

*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*
नाशिक(प्रतिनिधी):-नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी  योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत  पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नाशिक विभागाने तयारी केली असल्याची माहिती प्रभारी विभागीय आयुक्त तथा नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. सर्व जिल्ह्यांनी विविध प्रशासकीय विभागाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी करावी आणि त्याला व्यापक प्रमाणात सर्वसामान्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आयुष प्रसाद यांनी आज  सेवा संकल्प अभियान अंमलबजावणी आणि त्यासंदर्भात सर्व जिल्ह्यांनी केलेले नियोजन यासंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे, पाचही जिल्ह्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर अपर आयुक्त जितेंद्र वाघ, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, सहायक आयुक्त विठ्ठल सोनवणे, क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे,  महिला व बालविकास विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश देशमाने यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त तसेच सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने 17  सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यभर 'सेवा संकल्प अभियान' राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा नियोजनाचा आढावा प्र. विभागीय आयुक्त प्रसाद यांनी घेतला. तालुकास्तरावर सेवा सेतू अभियान अंतर्गत शिबिरे, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे आयोजित करून शासनाच्या विविध सेवांचे लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यात यावेत. राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यवसायिक व कॉर्पोरेट इनोव्हेटर्स व ग्रामीण भागातील नविन समाधाने (Solutions) विकसित करणाऱ्या लोकांना जोडण्यासाठी राज्यस्तरीय इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात यावे.
सेवा माझे योगदान या उपक्रमाचे प्रत्येक गावात / वार्डात आयोजन करण्यात यावे. याअंतर्गत लोकसहभागून रक्तदान, स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी मोहीम आदी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विकसित भारत संकल्प यात्रा, सेवा ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात यावे. शासकीय व खाजगी शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. सर्व अंगणवाड्यांच्या पातळीवर अंगणवाडी उत्सवाचे आयोजन करण्यात यावे. याशिवाय आशीर्वादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पाची रांगोळी, नमो सेवागाथा, जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ या कार्यक्रमांचे आयोजनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक जिल्ह्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. एका जिल्ह्यातील चांगल्या उपक्रमांची विभागातील इतर जिल्ह्यांनीही अंमलबजावणी करावी. थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत जाईल यादृष्टीने नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षित आहे.  यापूर्वी राबविण्यात आलेल्या अभियानातील उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक चांगले योगदान प्रत्येक जिल्ह्याचे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शासन निर्णयातील नमूद बाबीवर अधिक भर देऊन त्याप्रमाणे कार्यवाहीच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सेवा संकल्प अभियानाचे नियोजन सांगितले तर सदस्य सचिव तथा माहिती उपसंचालक डॉ. मोघे यांनी, या अभियानातील राबविण्यात येणाऱ्या विविध बाबींची माहिती, फोटो, रील्स ही प्रसिद्धीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर संबंधित जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
September, 18 2026
*नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान*
September, 18 2026
*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
September, 18 2026
*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
September, 17 2026
*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
September, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज