*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना-पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे
मध्य व पश्चिम रेल्वे विभागाने उधना- पुणे अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठे सोय झाली असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मागणी पूर्ण झाल्या बद्दल येथील नागरिक आणि व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला. डॉक्टर हिना गावित यांच्या प्रति आभार व्यक्त केले जात आहेत. पुणे येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून द्यावी, ही मागणी नंदुरबार जिल्ह्यातील छोटे मोठे व्यवसायिक तसेच प्रवासी नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते. मुंबईपसून दिल्लीपर्यंत अनेक स्तरावर निवेदन देण्यात आले होते. खासदार असतानाच्या कालावधीत डॉक्टर हिना गावित यांनी ही समस्या लक्षात घेऊन थेट तत्कालीन रेल्वेमंत्री यांच्याकडे पत्र देऊन तसेच रेल्वे विभागाकडे पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेरीस त्याला यश मिळाले आणि त्यामुळे उधना पुणे अमृत एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. ही रेल्वेगाडी उधना येथून सुटल्यावर नंदुरबार, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, क्वार्ड लाईनमार्गे हडपसर पुणेपर्यंत धावणार आहे. उधना ते पुणे अशी प्रवासी एक्सप्रेस रेत्वेगाडी सुरु होणार असल्याने प्रवाशांसाठी सोयीची ठरणार आहे. ही रेल्वेगाडी उधना रेल्वे स्टेशनहून निघाल्यावर जळगाव लाईनने नंदुरबारमार्गे मनमाड दौंड क्वार्ड लाईनने जोडली जाणार आहे. सदरची रेल्वेगाडी ही उधना येथून निघात्यावर नंदुरबार, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, दौंड क्वॉडलाईन, हडपसर मार्गे पुणेला पोहोचेल. या रेल्वे गाडीच्या गाडी क्रमांक व नियोजनाला अंतीम टप्प्यात तयारी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रस्तावित अमृत भारत रेल्वे गाडी उधना येथून निघाल्यावर नंदुरबारमार्गे जळगाव, मनमाड, अहिल्यानगरशी जोडली आहे. यामुळे नंदुरबारसह जळगाव, धुळे, अमळनेर भागातील प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सोयीची ठरणार आहे. या रेल्वेगाडीमध्ये आधुनिक कोच, चांगली सिटींग, चार्जिंग सुविधा अशा सोयीसुविधा उपलब्ध राहणार आहेत.



