*आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश,उधना- पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे धावणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश,उधना- पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे धावणार*
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश,उधना- पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे धावणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पुण्याला जाण्यासाठी नंदुरबार रेल्वे स्थानकावरून उधना ते पुणे अमृतभारत एक्स्प्रेस धावणार आहे. याबाबत शिवसेनेचे नेते,आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी रेल्वे प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला होता. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच पश्चिम रेल्वेचे जी.एम प्रदीप कुमार यांना निवेदन देखील सादर करण्यात आले होते. मध्य व पश्चिम रेल्वे विभागाने उधना- पुणे अमृतभारत रेल्वे गाडी सुरू करण्यास मान्यता दिली आहे. नंदुरबार येथून पुणे जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी यासाठी शिवसेना नेते, आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी रेल्वे प्रशासनाशी सतत आग्रही पाठपुरावा केला होता. 2 वर्षांपूर्वी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नंदुरबार रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यावेळी आ. रघुवंशी यांनी त्यांना निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे 6 महिन्यापूर्वी पश्चिम रेल्वेचे जी.एम प्रदीप कुमार आले असता त्यांना निवेदन देखील सादर करण्यात आले होते. उधना जळगाव रेल्वे मार्गावरील नंदुरबार हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जिल्ह्यातील अनेक व्यापारी खाजगी ट्रॅव्हल्स आणि वाहनांनी त्याचप्रमाणे अनेक कामगार, विद्यार्थी नेहमी पुणे येथे कामकाजा निमित्त जात असतात. पुणे जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे गैरसोयींच्या सामना करावा लागत होता. परंतु, आता उदना ते पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे धावणार असल्याने मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया देत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आभार मानले आहेत.



