*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथील कबड्डी संघाचे तालुका स्तरावर यश नंदुरबार जिल्हास्तरावर तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथील कबड्डी संघाचे तालुका स्तरावर यश नंदुरबार जिल्हास्तरावर तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व*
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथील कबड्डी संघाचे तालुका स्तरावर यश नंदुरबार जिल्हास्तरावर तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व*
शहादा(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, चावरा इंग्लिश मीडियम स्कूल शहादा येथे सुरू आहेत तेथे 14 वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धेत जी.एस. विद्यामंदिर वडाळी संघाने दणदणीत यश प्राप्त केले आहे साखळी गटातील सर्व सामन्यासह अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करायची सुवर्णसंधी संघाने प्राप्त केली आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल फकीरा पाटील, उपाध्यक्ष हिरालाल पाटील, सचिव ए.के. पाटील, संस्थेचे संचालक तथा शहादा नगरपरिषद नगराध्यक्ष अभिजीत पाटील, विकास प्रतिष्ठान अध्यक्षा सौ.प्रिती पाटील, संस्थेचे तज्ञ संचालक एस.पी.पाटील यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीत मैदानी खेळांसाठी मेहनत घेतली त्यांचे फळ त्यांना मिळाले असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी व्यक्त केले मुख्याध्यापक ए.आर.चौधरी पर्यवेक्षक व्ही.एच. जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक चंद्रकांत रायसिंग, एस.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.