*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दरवर्षी "स्वच्छता ही सेवा (SHS)" हा उपक्रम राबविला जातो. यावर्षीची अभियानाची मध्यवर्ती संकल्पना "स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत"अशी आहे.नंदुरबार जिल्हयात ग्रामपंचायतींनी "स्वच्छता ही सेवा (SHS)2026" हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यावर्षी स्वच्छता ही सेवा मोहिमेसाठी "स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत" थीम निश्चित करण्यात आली आहे. 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ जिल्हा, तालुका व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून केला जाणार आहे. या स्वच्छता पंधरवाड्यात जिल्ह्यातील गावस्तरावरील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार असून या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यात स्वच्छतेची लक्ष्यित ठिकाणे (CTUs) म्हणजे गावात कचरा टाकण्याची अस्वच्छ व वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे ओळखून, त्यांचे नकाशीकरण (Mapping) करून निश्चित कालावधीत ती पूर्णपणे स्वच्छ करण्यात येणार आहेत. स्वच्छ शाळा व युवकांचा सहभाग या उपक्रमात शाळांमध्ये "स्वच्छता ज्ञान यात्रा" हा उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये स्वच्छताविषयक संदेशाचा प्रसार करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी आणि "स्वच्छता आणि जल संचय संवाद" यांसारखे उपक्रम राबवून जागृती केली जाणार आहे. सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान या उपक्रमांतर्गत सफाई कामगारांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे त्यांना पीपीई किट्स (PPE Kits) व सुरक्षा साधनांचे वाटप करून स्थानिक पातळीवर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच लोकसहभाग या विशेष उपक्रमात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा अधिनियम 2026 नुसार 4 प्रकारच्या कचरा वर्गीकरण मोहीम, "एक पेड माँ के नाम" वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा आणि जागतिक पर्यटन दिन (२७ सप्टेंबर) निमित्त विशेष उपक्रम तसेच 2 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष बैठकांचे आयोजन केले जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी देशव्यापी "एक दिन, एक घंटा, एक साथ" या उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक श्रमदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छतेतुन समृध्दी या उपक्रमात "Waste to Wealth" (कचऱ्यातून संपत्ती) व "Waste to Art" (कचऱ्यातून कलाकृती) या संकल्पनांवर आधारित उपक्रम राबविण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. स्वच्छता ही सेवा कालावधीत ग्रामस्तरावर झालेल्या सर्व उपक्रमांची नोंद शासनाच्या पोर्टलवर अपलोड करून सनियंत्रण केले जाणार आहे. स्वच्छता ही सेवा मोहीमेत जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी सहभागी प्रभावीपणे राबवावी व लोकसहभाग आणि श्रमदानातून आपले गाव स्वच्छ व सुंदर करावे असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन )तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक गणेश मोरे यांनी केले आहे.



