*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
राहुरी(प्रतिनिधी):-अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी रामचंद्र विठ्ठल काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सभागृहात आज, 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे संचालक प्रशांत रामचंद्र काळे, अनिल साहेबराव चव्हाण, गोरख उत्तम इंगळे, अमोल अशोक कल्हापुरे, सतीश बाबासाहेब औटी, प्रसाद कारभारी लोखंडे, कमल रामचंद्र काळे, नंदा आप्पासाहेब ढूस, योगेश सुभाष बोरुडे, मारुती शंकर मोरे आदी संचालक उपस्थित होते. निवडीनंतर सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी सहाय्यक निबंधक खेडकर, नवनिर्वाचित चेअरमन रामचंद्र काळे व सर्व संचालक मंडळाचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन केले.



