*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
*उत्कर्ष कुणबी संस्था कोकणात यंदा गणेशोत्सवा निमित्त 15 एसटी बस सोडणार*
लांजा(प्रतिनिधी):-कोकणात गणेशोत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी उत्कर्ष कुणबी संस्थेच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून एसटी महामंडळाच्या गाड्या ना नफा, ना तोटा या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदाही संस्थेच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त तब्बल 15 एसटी बस सोडण्यात येणार आहेत. उत्कर्ष कुणबी संस्थेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत साखरपा दाभोळे पंचक्रोशीत पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत नदी वर बंधारे, पंचक्रोशीत शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप व प्रोजेक्टर वाटप, गावकार परिषद, व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, विशेष पदवी प्राप्त केलेल्या युवक युवतींचा सन्मान कार्यक्रम,साखरपा विभाग, सांगली, कोल्हापूर व चिपळूण येथील पुरग्रसतांना मदत, कॅन्सर रुग्णांना मदत, वृध्दाश्रम मध्ये मदत, अपंगांना मदत, निराधारांना मायेची ऊब अंतर्गत ब्लॅंकेट कपडे व अन्य धान्य वाटप, अपघातग्रस्तांना आर्थिक मदत, दुर्धर आजार रुग्णांना प्रोटीन, सत्वयुक्त आहार व फळ वाटप, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काजू बी संकलन उपक्रम, अंधारात चाचपडणाऱ्या दुर्गम भागातील वाड्यांवर सोलार लाईट व्यवस्था इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले. या संस्थेचे नाव उत्कर्ष कुणबी संस्था असली तरी सर्व धर्म समभाव अशा प्रकारे काम करत आहे. या एस टी उपक्रमाला कोकणवासीयांचा नेहमीच उस्फुर्त प्रतिसाद मिळतो.



