*हिरा प्रेरणा महोत्सवांतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिरा प्रेरणा महोत्सवांतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न*
*हिरा प्रेरणा महोत्सवांतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हिरा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित हिरा प्रेरणा महोत्सवांतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या स्पर्धेत मुलींचे 8 आणि मुलांचे 22 अशा एकूण 30 संघांनी सहभाग नोंदविला.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिरा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी होते. प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे सचिव तथा माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. अनिता शिरीष चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील, संस्थेचे युवा संचालक ॲड. गौरव चौधरी, सहसचिव महेंद्र फटकाळ, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडाशिक्षक बळवंत निकुंभ, पश्चिम खानदेश सेवा समितीचे युवा संचालक जयदीप नटावदकर, पोलीस उपनिरीक्षक सलीम तडवी, नवापूर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता सचिन पवार, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू कपिल बोरसे, पंचप्रमुख जे. व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हिरा प्रतिष्ठान अधिनिस्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक तसेच विद्यार्थी-खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पुढील वर्षापासून हिरा प्रेरणा महोत्सव जिल्हास्तरावर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक सलीम तडवी यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. खेळामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील अनेक 30 संघांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती चेतना चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश काटके यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेंद्र पाटील, विशाल चौधरी, अमोल भदाणे, रवी चौधरी आदींनी सहकार्य केले.



