*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
*शहादा तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन*
शहादा(प्रतिनिधी):-तालुक्यातील संकटग्रस्त महिलांनी महिला समुपदेशन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक त्रास, छळ किंवा इतर कोणत्याही अडचणीत असलेल्या शहादा तालुक्यातील महिलांना मोफत समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन व मदत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शहादा पोलिस स्टेशन (जुनी इमारत) आवारात महिला समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तालुक्यातील अन्यायग्रस्त पीडित महिलांनी न घाबरता या केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक आरती शिंदे व अर्चना पावरा यांनी केले आहे. सदर महिला समुपदेशन केंद्रामार्फत कौटुंबिक हिंसाचार, मानसिक त्रास तसेच इतर संकटात असलेल्या महिला व मुलींना मोफत समुपदेशन सेवा पुरविण्याबरोबरच पोलिस मदत, कायदेशीर मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार निवारा बाबत सहाय्य केले जाणार आहे. भेट देणाऱ्या महिलांची ओळख किंवा नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असून संकटग्रस्त महिलांनी न घाबरता समुपदेशन केंद्राशी संपर्क साधावा. सद्यस्थित जूने पोलिस स्टेशन आवार, प्रांताधिकारी कार्यालय पाठीमागे शहादा येथे समुपदेशन केंद्र कार्यान्वित झाले असून समुपदेशन केंद्राचा लाभ घ्यावा तसेच ९६०४२५२०५० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन समुपदेशक आरती शिंदे व अर्चना पावरा यांनी केले आहे.



