*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षणतज्ज्ञ व तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध उपक्रमांद्वारे शिक्षकांचा गौरव केला. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



