*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने महाविद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद, उत्साह आणि सांघिक एकतेचे दर्शन घडविले.
दहीहंडीच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी एकजूट, सहकार्य आणि संघभावनेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सांघिक भावना विकसित व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज एम.चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



