*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
लांजा(प्रतिनिधी):-श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, डी. जे. सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल, लांजा आयोजित 'प्रेरणा RunFest 2026' (भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा) मध्ये विविध वयोगटांत उज्ज्वल यश संपादन करून विद्यालयाचा गौरव वाढवला. यशस्वी विद्यार्थी व निकाल पत्रक 12 वर्षे वयोगट - मुलगे, उत्तेजनार्थ: कुमार वर्धन विकास जाधव (इयत्ता सहावी), 12 वर्षे वयोगट - मुली द्वितीय क्रमांक आरुषी अमोल गुरव (इयत्ता सहावी) 16 वर्षे वयोगट - मुलगे द्वितीय क्रमांक सोहम सहदेव करळकर (इयत्ता दहावी)
उत्तेजनार्थ: संस्कार संजय चव्हाण (इयत्ता दहावी), 16 वर्षे वयोगट मुली द्वितीय क्रमांक: मानवी सूर्यकांत बंडबे (इयत्ता आठवी), तृतीय क्रमांक सिद्धी संजय मोसमकर (इयत्ता सातवी) उत्तेजनार्थ पूर्वी सत्यवान राणे (इयत्ता नववी), उत्तेजनार्थ श्रेया संदीप घडशी (इयत्ता नववी) या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सचिन कांबळे व क्रीडा मार्गदर्शक निलेश कुळये यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



