ताजा खबरे:
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 16 सप्टेंबरला 'मराठी विश्वकोश परिचय परीक्षा'*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 16 सप्टेंबरला 'मराठी विश्वकोश परिचय परीक्षा'*

  • Share:

*जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 16 सप्टेंबरला 'मराठी विश्वकोश परिचय परीक्षा'*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शासन निर्णयानुसार 3 ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून, तर 3 ते 9 ऑक्टोबर हा कालावधी 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषेविषयी संशोधन, जनजागृती वाढवणे आणि मराठी विश्वकोशाच्या उपक्रमांची माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये  16 सप्टेंबर 2026 रोजी 'मराठी विश्वकोश परिचय परीक्षा' ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे,असे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सहायक सचिव, ललित कुडमथे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
मराठी विश्वकोश हा मराठीतील सर्वविषयसंग्राहक असा संदर्भकोश असून यात ज्ञान- विज्ञानाच्या विविध शाखा, तसेच महत्त्वाचे विचारप्रवाह नोंदींच्या स्वरूपात समाविष्ट आहेत. मराठी भाषेचा प्रसार करणे, जिज्ञासू वाचकांना मराठीत विचार करण्यास व लेखनास प्रवृत्त करणे, तसेच अकारविल्हे रचलेल्या या महाग्रंथाचे कार्य, संकल्पना आणि स्वरूप याची ओळख महाविद्यालयीन तरुणांना व्हावी, हा या परीक्षेमागील मुख्य हेतू आहे. परीक्षेचे स्वरूप व नियम,
पात्रता ही परीक्षा महाविद्यालयातील कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
अभ्यासक्रम व पद्धत, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येईल. ही परीक्षा संबंधित महाविद्यालयातच ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. निःशुल्क सहभाग व कमाल मर्यादा नाही, परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून विद्यार्थ्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. ऑनलाइन नोंदणी आवश्यक, परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाने दिलेल्या https://forms.gle/ZsKd4dTZyyVumQzV6  या गुगल लिंकद्वारे पूर्वनोंदणी फॉर्म भरणे बंधनकारक आहे. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे, तसेच महाविद्यालयीन समन्वयकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय महाविद्यालयीन स्तरावर प्रथम तीन प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा, तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयां मधून प्रथम पाच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरावर यथोचित गौरव केला जाणार आहे. परीक्षेचे मूल्यांकन व निकालाबाबत अंतिम निर्णय मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अधीन राहील.
जिल्ह्यातील महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसण्यास प्रवृत्त करावे, तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाची 'समन्वयक' म्हणून निवड करावी. परीक्षेच्या नियोजनासंदर्भात अधिक माहितीसाठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ. स्नेहा खोब्रागडे भ्रमणध्वनी 9049311386 आणि संतोष गेडाम 7972771654  यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ज्ञानवर्धक उपक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन मंडळाचे सहायक सचिव कुडमथे यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
September, 04 2026
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
September, 04 2026
*आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे सुयश*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज