*वैतरणा–वाढीव बेटावरील विद्यार्थी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी खासदार हेमंत सावरा यांची भेट डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने मांडल्या विविध समस्या*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वैतरणा–वाढीव बेटावरील विद्यार्थी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी खासदार हेमंत सावरा यांची भेट डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने मांडल्या विविध समस्या*
*वैतरणा–वाढीव बेटावरील विद्यार्थी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी खासदार हेमंत सावरा यांची भेट डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने मांडल्या विविध समस्या*
वैतरणा(प्रतिनिधी):-वैतरणा–वाढीव बेटावरील विद्यार्थी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांबाबत पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत सावरा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वैतरणा रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानकातील प्रवाशांच्या समस्या तसेच वाढीव- वैतरणा बेटावरील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
वाढीव बेटावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बेटावरून ये-जा करण्यासाठी सुरक्षित आणि नियमित वाहतुकीची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी सुरक्षित ये-जा करण्याची व्यवस्था नसल्याने एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायी असून, भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात खासदार हेमंत सावरा यांच्याशी चर्चा करून वाढीव बेटावरील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित प्रवासाची व्यवस्था, नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न आणि आवश्यक मूलभूत सुविधांबाबत संबंधित प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच वाढीव- वैतरणा बेटाला मुख्य भूमीशी जोडणारा पूल व रस्ता तसेच वैतरणा–सफाळे जोडरस्ता विकसित करण्याच्या मागणीबाबतही चर्चा करण्यात आली. या मार्गामुळे बेटावरील नागरिकांना सुरक्षित व सुलभ रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होऊन विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्याचबरोबर
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने वैतरणा रेल्वे स्थानकातील विविध प्रलंबित समस्यांबाबतही खासदारांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यात भुयारी मार्गात साचणारे पाणी, सुरक्षित पर्यायी मार्गाची आवश्यकता, प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा, स्थानकाबाहेरील रस्त्यांची दुरवस्था तसेच इतर विविध प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने DFCC रेल्वे मार्ग ओलांडण्याची वेळ प्रवाशांवर येऊ नये, यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. या पाहणी व चर्चेच्या वेळी आमदार राजन नाईक, जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, मंडळ अध्यक्ष वैभव झगडे, हरेश्वर पाटील तसेच डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावड सहसल्लागार व सखाराम पाटील हे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या स्टेशन कमिटीचे पदाधिकारी, संस्थेचे कार्यकर्ते तसेच वैतरणा– वाढीव बेट परिसरातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, रेल्वे मार्ग ओलांडण्याचा धोका आणि बेटावरील सुरक्षित दळणवळणाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून वैतरणा रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, यापुढेही विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालावा लागू नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी हा प्रश्न शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.



