*नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुणवंत शिक्षकांना ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’7 सप्टेंबर रोजी याहामोगी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुणवंत शिक्षकांना ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’7 सप्टेंबर रोजी याहामोगी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ*
*नंदुरबार जिल्ह्यातील सहा गुणवंत शिक्षकांना ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’7 सप्टेंबर रोजी याहामोगी सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सन 2026 चा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ 7 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 2 वाजता याहामोगी सभागृह, जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या सहा तालुक्यांतील प्रत्येकी एका शिक्षकाची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागाचे आयुक्त यांच्या 31 ऑगस्ट 2026 रोजीच्या मंजुरीनंतर या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक, श्रीमती सोनल निंबा बोरसे
जि.प.शाळा कोठली ता. नंदुरबार, भरत बाबूलाल सावळे
जि.प.शाळा वावडी ता.नवापूर,
तुकाराम गुंडेराव अलट जि.प.शाळा काथर्डे खु. ता.शहादा, दिलीप गणसिंग पावरा
जि.प.शाळा, कोठार ता.तळोदा,
जितेंद्रसिंग जवानसिंग वळवी
जि.प.शाळा कुआ ता.अक्कलकुवा,
सुनील शिवलाल चित्ते जि.प.शाळा जुने धडगाव ता. धडगाव, या गुणवंत शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यासाठी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि समाजाच्या जडणघडणीचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहे. ग्रामीण व दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा जिल्हा शिक्षक पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना जिल्ह्यातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी स्वरूप प्राप्त होणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभास जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहून पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव वाढवावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



