ताजा खबरे:
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 19 लाख 18 रुपये किमतीचा 39 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*2 लाख 94 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत विमल गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 19 लाख 18 रुपये किमतीचा 39 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 19 लाख 18 रुपये किमतीचा 39 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

  • Share:

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 19 लाख 18 रुपये किमतीचा 39 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने अवैध दारुची वाहतूक, साठा, अवैध अग्निशस्त्र, अंमली पदार्थाची लागवड इत्यार्दीवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. 3 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतील सटीपाणी शिवारात मालनदेवी नाल्याजवळ एका इसमाने भुईमुंग पिकाच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा पोलीस ठाणे हद्दीतील मलगांव ते सटीपाणी शिवारातील मालनदेवी नाल्याजवळ एका भुईमुंगाच्या शेताची पाहणी केली असता तेथे भुईमुंग पिकाच्या आत 39 किलो 04 ग्रॅम वजनाचे 18 लाख 19 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आली. गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली.
तसेच बेकायदेशीररित्या गांजा सदृष्य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करतांना आरोपी नामे ठाणसिंग हुंड्या ऊर्फ टुंड्या पावरा, रा. जामजिरा जालोद, पोस्ट तहऱ्हाड कसबे, ता. शिरपुर, जि. धुळे याचेविरुध्द् शहादा पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम -1985 चे कलम 8(c), 20(a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, स्वप्नील गोसावी, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार भरत उगले, शोएब शेख, विशाल मराठे, सतिष घुले यांच्या पथकाने केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 19 लाख 18 रुपये किमतीचा 39 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 03 2026
*2 लाख 94 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत विमल गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 03 2026
*गणेशोत्सवाचे खास आकर्षण संदेश काटकर यांचे "कौशल्याचा पुत्र राम" गीत प्रदर्शित*
September, 03 2026
*कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी संस्थेचा "स्नेहमेळावा आणि समाजभूषण पुरस्कार सोहळा" उपस्थितीत जल्लोषात संपन्न*
September, 03 2026
*कशेळी येथे युवा ग्रुप वाडीवठारतर्फे भव्य रक्तदान शिबिर*
September, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज